कर्मयोगी लोकसेवक आणि कट्टर राजसमर्थक!
लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण, बँकिंग, सहकार, दूध आणि इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान काम करणारे खरे लोकसेवक म्हणजे आपले पुणे लोकसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार मा. दीपकभाऊ पायगुडे. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात जेव्हापासून ते आहेत अगदी तेव्हापासूनच ते आदरणीय राजसाहेबांबरोबर एकनिष्ठ आहेत. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने समाजकार्य केले. दीपकभाऊंनी सुरु केलेली फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळा असो, पाषाण येथील लोकसेवा ई-स्कूल असो, लोकसेवा सहकारी बँक असो, लोकसेवा दुग्ध प्रकल्प अस…