मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये पैसे वाटप करत असल्याच्या आरोपावरून तणाव निर्माण झाला. चेंबूरच्या महाराष्ट्र नगर भागात पैसे वाटप होत असल्याच्या संशयानं शिवसेनेनं मनसेच्या गाडीची अडवणूक केली. यावेळी शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे आणि पोलिसही सोबत होते. पण त्या गाडीतून काहीच आक्षेपार्ह समोर आलं नाही.
याचवेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीत एक पोलिस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे.